भाजपाच्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी चक्क काँग्रेसला मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. 

नवी दिल्ली -  मध्यप्रदेश विधानसभेच्या 28 जागांसाठी 3 नोव्हेंबरला होणाऱ्या पोटनिवडणुकांत प्रचारामध्ये ज्योतिरादित्य सिंदिया व सचिन पायलट हे दोन युवा नेते समोरासमोर उभे ठाकले आहेत. ज्योतिरादित्य यांनी काँग्रेसचा त्याग करून भाजपामध्ये प्रवेश केला, तर नाराज सचिन पायलट यांनी काँग्रेसमध्ये राहणे पसंत केले. मध्य प्रदेशात विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. सध्या प्रचारात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याच दरम्यान एका प्रचारसभेत भाजपाच्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी चक्क काँग्रेसला मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. 
ज्योतिरादित्य शिंदे यांचा हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावरून निशाणा साधला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत ज्योतिरादित्य शिंदे यांनी जोरदार भाषण केलं. भाषणाच्या शेवटी त्यांनी लोकांना आवाहन करताना "पंजा समोरील बटण दाबून विजयी..." म्हटलं. पण आपल्याकडून बोलताना चूक झाली हे लक्षात येताच त्यांनी तातडीने ती दुरुस्ती केली.

Post a comment

0 Comments