प्लाॅटीगंमधील मोकळ्या जागेवरील अतिक्रमण सात दिवसात हटविण्याची मागणी, अन्यथा आठव्या दिवशी रासपच्या वतीने आत्मदहनाचा दिला इशारा .....वैजापूर,दि. ५ गुरुवार :वैजापूर शहरातील शिवराई रोडवरील जनार्दन नगर येथे सन २००० मध्ये गोविंद धुमाळ या स्थानिक  बिल्डरने प्लाॅटीगं सुरू केली होती व त्या प्लाॅटीगंमध्ये रस्ता, ओपनस्पेस अशी मोकळी जागा दाखवून प्लाॅट विक्री केले होते परंतु कालांतराने सदरील ओपनस्पेस या मोकळ्या जागेवर संबंधित राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक गोविंद जनार्दन  धुमाळ यांनी ओपनस्पेस जागेवर अतिक्रमण करून बाधकाम केले आहे.  याबाबत अतिक्रमण काढण्याबाबत काॅलणीतील नागरिकांनी वारंवार अर्ज करूनही अद्याप त्यावर कारवाई करण्यात आलेली नसुन संबंधित व्यक्तीने काॅलणीतील नागरिकांची दिशाभूल करून ओपनस्पेस जागेवर अतिक्रमण करून त्या जागेवर मका व विविध पिक घेऊन जागेवर अतिक्रमण करून  नागरिकांची फसवणूक केली आहे याबाबत राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने ता.२१ ऑक्टोबर रोजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना सदरील  अतिक्रमण हटवुन कारवाई करण्याबाबत निवेदन देण्यात आले होते परंतु अद्यापही नगरपरिषदेकडुन कोणतेही पाऊल न उचल्याने सात दिवसाच्या आत सबधीत अतिक्रमण बाबत कारवाई न झाल्यास आठव्या दिवशी कार्यकत्यासह आत्मदहन करण्याचा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दिपक जगताप व रासपचे कार्यकर्ते व सबधीत नागरिकांनी  यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले असून याप्रकरणी पुढील अपरिहार्य घटनेची सपुर्ण जबाबदारी नगरपरिषद व प्रशासन यांची  असणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे त्यामुळे आतातरी यावर नगरपरिषदेकडुन प्रशासनाकुन ठोस कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a comment

0 Comments