कोरोनामुळे मृत्यू आणि उघडकीस आला ६ कोटींचा घोटाळा

कल्याण : कोरोनामुळे कल्याणमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या व्यक्तीच्या मृत्यूनंतर एक अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे. या व्यक्तीने नागरिकांना तब्बल ६ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचं त्याच्या मृत्यूनंतर समोर आलं आहे. एका व्यक्तीच्या नावावर दहा बँकेत कर्ज काढले गेले. समोरचा व्यक्ती व्याज घेऊन खूश होता. मात्र, जेव्हा बँकेचे हप्ते बंद झाले. तेव्हा समजले की, सर्वसामान्य माणूस फुकटात पैसे मिळतात, या लालसेपोटी कसा जाळ्यात अडकू शकतो, ही बाब उघड झाली आहे. या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. आता नामांकित १५ बँकेतील अधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे 

२ जुलै २०२० रोजी संकल्प फायनान्सचे मालक प्रशांत महादेव कांबळी यांचा मृत्यू झाला. प्रशांत यांनी काही जणांना बँकेतून कर्ज काढून दिले होते. लोकांना गरजेपेक्षा १० ते २० पटीने जास्त कर्ज काढून दिले. जितकी गरज असायची तेवढी रक्कम लोकांना देऊन उर्वरीत रक्कम आपल्या कंपनीत गुंतवित होते. जे लोक कर्ज काढत होते. त्यांना इतकाच आनंद होता की, हप्ता हा प्रशांत कांबळी भरत होते.

Post a comment

0 Comments