महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने केला डॉ आबासाहेब सिरसाठ यांचा गौरवगंगापुर प्रतिनिधि( प्रकाश सातपुते) 

मनुष्यबळ अकादमी मुंबई यांच्या वतिने सामाजिक,
शैक्षणिक,राजकीय,धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य
कर्तृत्वा बद्दल गंगापूरचे शिवसेना नगरसेवक डॉ.आबासाहेब सिरसाठ सर यांना कुशल नेतृत्व जननायक पुरस्कार मिळाल्या मुळे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या व गंगापूर शिक्षक पतसंस्थेतेच्या वतिने त्यांचा सन्मान पूर्वक गौरव करण्यात आला.प्रसंगी शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष तथा चेअरमन सुनिल जाधव,संपर्क प्रमुख दादासाहेब पाचपुते,जिल्हा संघटक तिलकेश्वर सिरसाठ, शिक्षक सेना तालुकाध्यक्ष तथा संचालक जे.के.राऊत, सिद्धनाथ वाडगावचे स्वामी विवेकानंद इंग्लीश
स्कुलचे प्रमोद महाजन,मा.गोपीनाथ प्रधान, आर.पी.चव्हाण बाँस,सरचिटणीस अंकुश रावते ज्ञानेश्वर
झळके,दिलीप धर्माधिकारी, रामेश्वर पानकर यांची
उपस्थिती होती.

Post a comment

0 Comments