कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन चाचण्यांची सज्जता ठेवावी - जिल्हाधिकारी सुनील चव्हाण.

           
औरंगाबाद,दि.२२ सोमवार : कोरोनाच्या  दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वाढीव चाचण्यांसाठी घाटी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रयोगशाळेनी सज्जता ठेवावी,असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिले.
            डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रयोगशाळेला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी  आज भेट दिली, त्यावेळी त्यांनी संबंधितांना निर्दश दिले. यावेळी घाटीच्या सुक्ष्म जीवशास्त्र विभागाच्या डॉ ज्योती बजाज , विद्यापीठातील प्रयोगशाळेचे संचालक डॉ.खेडकर यांच्या सह इतर संबंधित उपस्थित होते.
            यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील कोवीड संसर्गाची संभाव्य वाढ लक्षात घेऊन प्रशासनाकडून आरोग्य यंत्रणामार्फत पूरक उपाययोजना करण्यात येत आहे. त्याचसोबत वाढीव प्रमाणातील  चाचण्यां तातडीने होण्याच्या दृष्टीने  जिल्ह्यातील प्रयोगशाळा सज्ज असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने घाटीच्या तसेच विद्यापीठातील प्रयोगशाळेनी पुरेसे मनुष्यबळ, यंत्रसामुग्री यासह सज्ज रहावे.परस्पर समन्वयातून चाचण्यांचे प्रमाण आणि तत्परतेने चाचणी अहवाल उपलब्ध करून देण्यासाठीची  तयारी  ठेवावी, असे  निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.


Post a comment

0 Comments