उद्याच्या देशव्यापी संपासाठी शिक्षक समितीचे आवाहन.

उद्याच्या देशव्यापी संपासाठी शिक्षक समितीचे आवाहन.
सरकारी कर्मचारी आणि शिक्षक संघटनांनी शासनाकडे मांडलेल्या अनेक मागण्या अद्यापही प्रलंबित आहेत.

औरंगाबाद : सरकारने शासनाच्या अखत्यारीतील शिक्षण, उद्योग, शेती आदी मालकीचे खाजगीकरण, कत्रांटीकरणाचे धोरण रद्द करण्यात यावे, संवंर्गनिहाय कर्मचार्‍यांच्या मागण्या सोडविण्यासाठी सरकारी कर्मचारी समन्वय समितीने 26 नोव्हेंबरला योजिलेल्या संपात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सहभागी होणार असल्याची माहिती राज्याध्यक्ष उदय शिंदे, राज्य सरचिटणीस विजय कोंबे यांनी अहमदनगर येथील राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत जाहीर केले आहे.

कोरोनाच्या महामारीत जीवाची बाजी लावून योद्धा म्हणून लढा देणार्‍या सरकारी आणि कंत्राटी कर्मचार्‍यांच्या प्रमुख मागण्यांकडे केंद्र आणि राज्य सरकारने दुर्लक्ष केले. 

सरकारी कर्मचारी आणि शिक्षक संघटनांनी शासनाकडे मांडलेल्या अनेक मागण्या अद्यापही प्रलंबित आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने कर्मचारी विरोधी धोरणे अंमलात आणण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे श्रमिक जगतावर त्याचा परिणाम होत आहे. 

यासाठी 2 ऑक्टोबर रोजी 10 राष्ट्रीय कामगार संघटनांनी परिषद घेतली होती. या बैठकीत कामगार आणि शेतकरी विरोधी धोरणांना पायबंद घालण्यासाठी येत्या 26 नोव्हेंबरला देशव्यापी संपाची घोषणा करण्यात आली आहे. यात विविध मागण्या मान्य होण्यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे आवाहन शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष विजय साळकर, जिल्हा सरचिटणीस रंजित राठोड यांनी केले आहे.

Post a comment

0 Comments