अंबडचे शिवसेना तालुका उपप्रमुख श्रीमंत खटके यांच्या घरावर दरोडा.

अंबडमध्ये दरोडा टाकून चोरट्यांनी 20 ते 21 लाखांचा मुद्देमाल लंपास.
अंबडचे शिवसेना तालुका उपप्रमुख श्रीमंत खटके यांच्या घरावर दरोडा.

जालना : वडीगोद्री (ता. अंबड) येथील औरंगाबाद – सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर अंबडचे शिवसेना तालुका उपप्रमुख श्रीमंत खटके यांच्या घरावर चोरट्यांनी दरोडा टाकून जवळपास 20 ते 21 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
वडीगोद्री (ता. अंबड) येथे येथे औरंगाबाद – सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर अंबडचे शिवसेना तालुका उपप्रमुख श्रीमंत खटके यांच्या घरावर चोरट्यांनी दरोडा टाकून जवळपास 20 ते 21 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. 

औरंगाबाद रस्त्यावर खटके यांचे निवासस्थान आहे. गुरुवारी (ता.19) पहाटे चार वाजेच्या सुमारास चोरट्यांनी प्रवेशद्वार तोडून घरात घुसले. 
एकाने खटके यांच्या आजीच्या मानेला चाकू लावला व दोघांनी कपाटात ठेवलेले नगदी एक लाख चाळीस हजार व दागिने, असे मिळून एकूण 20 ते 21 लाखांचा मुद्देमाल काढुन घेतला. 
शस्त्र हातात घेतलेल्या चोरट्यांनी घरातील इतर सदस्यांना दमदाटी करून सगळा माल लंपास केला. या घटनेमुळे या भागात खळबळ उडाली आहे. 
वडीगोद्री पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप जोगदंड, शहागड पोलिस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वारे घटनास्थळी दाखल झाले असून पुढाल तपास करत आहे.

Post a comment

0 Comments