भाजपा कडून मराठवाडा पदवीधर मतदारसंघा ची उम्मेदवारी अद्याप गुलस्त्यातच , काकांच्या भूमिकेने अनेकांच्या भुवया उंचावल्या


औरंगाबाद -
भाजपा कडून मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील उम्मेदवारी अद्याप गुलदस्त्यातच असून पदवीधर मतदरसंघातील सर्व प्रतिस्पर्ध्यांची अमानत रक्कम जप्त करीत दुसऱ्यांदा रेकॉर्ड ब्रेक विजय संपादन केलेले  माजी केंद्रिय राज्य मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी ही उम्मेदवारी अर्ज आणल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
गायकवाड यांच्या नावे पदवीधर मतदारसंघात सर्व प्रतिस्पर्ध्यांचे जमानत जप्त करण्याचा भीमपराक्रम अजुन ही अबाधित आहे. त्यामुळे भाजपा कडून अपयशाचे प्रयोग करण्या पेक्षा मतदारसंघातील नाळ माहिती असणाऱ्या गायकवाड यांनाच उम्मेदवारी देण्यात यावी असा सुर गायकवाड यांचे चाहते आवळत आहेत. त्याच बरोबर सद्य मितीला गायकवाड यांच्या तोडीचा दुसरा प्रबळ उम्मदेवार कोणत्या ही पक्षाकडे नाही म्हणून भाजपा ने त्यांना उम्मेदवारी देऊन आपला विजय पक्का करावा असे मत आता समोर येऊ लागले आहे.
.

Post a comment

0 Comments