पहिल्यांदाच दहावी, बारावी पुरवणी परीक्षा केंद्रावर ‘ड्रोन’.

परीक्षा, परिसराचे चित्रीकरण करण्याचा निर्णय.

औरंगाबाद : जिल्ह्यात 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत इयत्ता दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा होणार आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी अभ्यास करून प्रामाणिकपणे परीक्षा द्याव्यात. 
कॉपीच्या अपप्रकारात अडकुन होणारे शैक्षणिक नुकसान विद्यार्थ्यांनी टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गुरूवारी दि.12 विद्यार्थ्यांना केले. या परीक्षेवर नजर ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाणार आहे. 

राज्यात प्रथमचा असा प्रयोग होत असल्याचे चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पुरवणी परीक्षांसंदर्भात माहिती देण्यासाठीच्या गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ही माहिती दिली. 
यावेळी पोलीस उपायुक्त मीना मकवाना, डॉ. बी.बी. चव्हाण, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) उपस्थित होते. जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले की, जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा (इ. 12 वी) दि. 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2020 या कालावधीत होणार आहे. 
इयत्ता 12 वी साठी जिल्ह्यामध्ये एकुण 15 केंद्रावर 2795 विद्यार्थी परीक्षेस बसणार आहेत. तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा (इ. 10 वी) 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2020 या कालावधीत होणार असून इयत्ता 10 वी साठी जिल्ह्यामध्ये एकुण 15 केंद्रावर विद्यार्थी - 2402 परीक्षेस बसणार आहेत. परीक्षेचे गोपनीय साहित्य व संकलनासाठी 8 परिक्षक केंद्र (कस्टोडियन) स्थापन करण्यात आले असून या परीक्षेचे चित्रीकरण व ड्रोन कॅमेराचा वापर राज्यात पहिल्यांदाच या परीक्षांदरम्यान केला जाणार असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांशिवाय इतर दिसल्यास गुन्हा दाखल : परीक्षा काळात विद्यार्थ्यांशिवाय इतरांनी वर्गात किंवा केंद्राच्या आवारात प्रवेश केल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. 
परीक्षा केंद्राच्या 100 यार्ड परिसरात कलम 144 लागू राहणार आहे. जिल्ह्यासाठी शिक्षणाधिकारी, (माध्यमिक), शिक्षणाधिकारी (निरंतर), असे भरारी पथक कार्यरत राहणार आहेत. तर तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकार्‍यांचे पथके कार्यरत राहील.


Post a comment

0 Comments