राज्यात ‘सीसीआय’च्या (भारतीय कापूस महामंडळ) कडून कापूस खरेदीला मंगळवारपासून (ता. १०) प्रारंभ होणार आहे. .नागपूर,दि ६ शुक्रवार : दिराज्यात कापसाखालील सरासरी क्षेत्र ४१ लाख हेक्टर आहे. २०१९-२० या हंगामात राज्यात सरासरीपेक्षा १ लाखाची वाढ नोंदविण्यात आली. यावर्षीदेखील सरासरीपेक्षा दोन लाख हेक्टरने लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. या वर्षी लागवड क्षेत्र सुमारे ४३ लाख हेक्टरवर पोहोचले. सुमारे ४५० लाख क्विंटल कापूस उत्पादनाचा अंदाज तज्ज्ञांकडून लागवड क्षेत्रात वाढीच्या पार्श्वभूमीवर वर्तविण्यात आला. 

दरम्यान, संततधार पाऊस, अतिवृष्टीचा फटका बसत राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये कापसावर कीड-रोगाचा प्रादुर्भाव वाढीस लागला. अनेक ठिकाणी बोंडसड झाली तर सद्यःस्थितीत अनेक जिल्ह्यांमध्ये गुलाबी बोंड अळीने पीक पोखरले आहे. त्याचा थेट परिणाम उत्पादकतेवर होणार असल्याचे जाणकार सांगतात. त्यामुळे राज्यात सुरुवातीला अपेक्षित ४५० लाख क्‍विंटलची उत्पादन ५० लाख क्विंटलने कमी होईल, अशी शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली गेली आहे. त्यानंतर देखील बाजारात येणाऱ्या कापसाची प्रत अपेक्षित राहणार नाही, त्यामुळे त्याला दरही मिळणार नाही, असे सांगितले जाते. संततधार पाऊस सुरू असल्याने कापूस भिजला, परिणामी, त्यात ओलावा अधिक असल्याने ‘सीसीआय’कडून कडून खरेदीस विलंब होत होता. परिणामी दिवाळीसाठी लागणाऱ्या पैशांची सोय म्हणून काही शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना कापसाची विक्री केली. बाजारात ३८०० ते ४००० हजार रुपये या दराने शेतकऱ्यांकडून हा कापूस खरेदी करण्यात आला. तब्बल पंधराशे रुपये या व्यवहारात शेतकऱ्यांना कमी मिळाले.

आता मंगळवार (ता. १०) पासून ‘सीसीआय’ने ८३ केंद्रांवर कापूस खरेदीची घोषणा केल्याने बाजारात काही अंशी तेजी येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. त्याच प्रयत्नाअंतर्गत गुरुवारी (ता. ५) जळगाव जिल्ह्यातील सिंदखेडा येथे एका केंद्रावर ‘सीसीआय’कडून प्रायोगिक तत्त्वावर कापसाची खरेदी देखील सुरू करण्यात आली. ५८२५ रुपये या हमीभावाने कापसाची खरेदी होणार आहे. 


Post a comment

0 Comments