जिथे आहात, तिथूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करा; चैत्यभूमीवर गर्दी नको : मुख्यमंत्री

मुंबई : “महापरिनिर्वाण दिन हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. या अभिवादनासाठी ज्या-ज्या गोष्टी करायच्या, त्या सर्व गोष्टी केल्या जातील. त्यामध्ये कुठेही कमीपणा येऊ देणार नाही. पण कोरोना संकटामुळे यावर्षी मात्र जनतेने अभिवादनासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर गर्दी करू नये. परिस्थितीचे भान ओळखून या अनुयायांनी आपल्या कृतीतून विचारांची प्रगल्भता दाखवावी,” असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली 6 डिसेंबर रोजीच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक झाली.

Post a comment

0 Comments