आयुक्तांनी कपडे, सायकल केले दान.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गरजूंच्या मदतीसाठी महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्या संकल्पनेतून माणुसकीची भिंत हा उपक्रम राबविला जात आहे.
औरंगाबाद : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गरजूंच्या मदतीसाठी महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्या संकल्पनेतून माणुसकीची भिंत हा उपक्रम राबविला जात आहे. 
शहरातील नऊ प्रभाग कार्यालयांत 12 ठिकाणी या उपक्रमाचे नियोजन केले आहे. या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी गुरूवारी दि.12 आयुक्तांनी आपल्या घरातील कपडे, मुलांची सायकल दान केली. 

माणुसकीची भिंत या उपक्रमात नागरिकांना आपल्या घरात नको असलेले देऊन जा व हवे असलेले घेऊन जा, असे आवाहन पालिकेने केले आहे. या उपक्रमाची सुरूवात आयुक्त पांडेय यांनी गुरूवारी सकाळी सिडको एन-1 येथे कपडे व रिलायन्स मॉल येथे देखील काही कपडे आणि त्यांचे चिरंजीव देवमान याची सायकल देऊन केली. यावेळी रिलायन्स मॉल येथे एका छोट्या मुलीला ही सायकल फार आवडली. त्यामुळे तिला ही सायकल भेट देण्यात आली. 
तसेच या ठिकाणी नागरिकांनी आपल्या घरातील वापरात नसलेल्या वस्तू देखील दिल्या आहेत. यातील एक कापडी पिशवी एका लहान मुलीला आवडली व तिने ती लगेच घेतली. 
तिच्या चेहर्‍यावर जो आनंद होता, तो खर्‍या अर्थाने पालिकेच्या माणुसकीची भिंत या उपक्रमाचे सार्थक झाल्याचे प्रतीक होता. या उपक्रमाला पहिल्याच दिवशी शहरवासीयांकडून चांगला प्रतिसाद मिळाल. 
याप्रसंगी आयुक्तांच्या समवेत घनकचरा व्यवस्थापन प्रमुख नंदकिशोर भोंबे यांची प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन गरजूंना आपल्या परीने वस्तू स्वरुपात मदत करावी, असे आयुक्त पांडेय यांनी केले आहे.

 

Post a comment

0 Comments