पुनर्विवाहाला नकार दिला म्हणून विधवा महिलेचं नाक आणि जीभ कापली

जोधपूर :- महिला सुरक्षेसाठी राज्य पातळीवर विविध कठोर कायदे करण्यात आले आहेत. पण तरीही महिलांविरोधात घडणाऱ्या गुन्ह्यांची संख्या कमी झालेली नाही. आजही देशाच्या वेगवेगळया भागांमध्ये महिलांवर क्रूर पद्धतीने अत्याचार होत आहेत. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये असाच माणुसकीला लाजवणारा एक प्रकार समोर आला आहे.
एका २८ वर्षीय विधवा महिलेने नातेवाईकासोबत पूर्नविवाहाला नकार दिला म्हणून सासरकडच्या मंडळींनी तिचं नाक आणि जीभ कापून टाकली. या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक केली असून सहआरोपींचा शोध सुरु आहे असे स्थानिक पोलीस अधिकारी कांता सिंह यांनी सांगितले. 
जखमी महिलेचे सहावर्षांपूर्वी लग्न झाले होते. पण लग्नानंतर वर्षभरातच तिच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर सासरकडची मंडळी तिचे एका नातेवाईकासोबत लग्न लावून देण्याचा प्रयत्न करत होते. "माझ्या बहिणीने लग्नाचा प्रस्ताव फेटाळून लावल्यानंतर सासरकडच्या मंडळींनी आमच्या घरी येऊन माझ्या बहिणीवर हल्ला केला. आरोपींनी माझ्या बहिणीचं नाक आणि जीभ कापली. तिच्या उजव्या हातालाही मार लागला. माझी आई हल्लेखोरांपासून तिला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. त्यात ती सुद्ध जखमी झाली" असे महिलेच्या भावाने सांगितले. जखमी महिलेवर जोधपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Post a comment

0 Comments