वैजापूरच्या पोलीस निरीक्षक पदी सम्राटसिंह राजपूत.


वैजापूर - राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार विजेते पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांची आज पुणे शहर याठिकाणी बदली झाली तसेच वैजापूरचे नवीन पोलीस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत यांनी आज वैजापूर पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्विकारला. यानिमित्ताने आज पोलीस ठाणे वैजापूर येथे निरोप समारंभ चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी म्हटले की वैजापूर मला माझ्या कुटुंबासारखे असून मि कधीच विसरणार नाही तसेच माझ्या यशामध्ये माझ्या सहकाऱ्यांचा व कुटुंबाचा वाटा असल्याचे देखील ते म्हणाले.

विविध संघटनेच्या वतीने श्री राजपूत याचा पोलीस स्टेशन मध्ये फुल गुच्छ देऊन स्वागत  करण्यात आले या प्रसंगी पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांना निरोप देण्यात आला.
 या वेळी मंचावर आमदार रमेश बोरणारे,मा नगराध्यक्ष डॉ दिनेश परदेशी,मा नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, उपविभागीय अधिकारी माणिकराव आहेर,उप नगराध्यक्ष साबेर खान, गट नेता प्रकाश चव्हाण ,प्रक्षिणार्थी तहसीलदार निखिल धुळधर , मर्चंट बँकेचे चेअरमन विशाल संचेती,मदरसा प्रमुख नाजीस साहब, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष ऍड प्रतापराव निबाळकर, साहेबराव औताडे आदी या वेळी मंचावर उपस्थित होते.
तर यावेळी विविध मान्यवरांचे मनोगत व्यक्त केले या वेळी शहरातील विविध मान्यवर, व्यापारी ,पोलीस मित्र,पत्रकार आदी या वेळी उपस्थित होते.

Post a comment

0 Comments