पुण्यात मनसेच्या पदाधिकाऱयांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पुणे- राज्यभरात महावितरणकडून नागरिकांच्या माथी वाढीव वीजबिलांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शनिवारवाडा पासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार होता. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती. तरीही शेकडो कार्यकर्त्यांची जमाव करून मोर्चा काढण्याच्या तयारीत असलेल्या मनसेच्या शहर पदाधिकाऱ्यांना शनिवारवाड्यावरून ताब्यात घेतले गेेले. 
पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार रुपाली पाटील ठोंबरे, माजी नगरसेवक किशोर शिंदे, अजय शिंदे, माजी नगरसेविका पुष्पा कनोजिया, सुरेखा मकवाना, बाबु वागस्कर, रणजित शिरोळे यांच्यासह आजी माजी पदाधिकाऱ्यांना फरासखाना पोलिस ठाण्यात ताब्यात घेऊन बसवून ठेवले. त्यानंतर संतप्त मनसेच्या कार्यकर्त्यांनी फरासखाना पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केेले. प्रचंड घोषणाबाजी सुरू ठेवले. जमावाच्या गर्दीमुळे आप्पा बळवंत चौक, शिवाजी रस्त्यावर वाहतूककोंडी झाली आहे

Post a comment

0 Comments