चंद्रशेखर बावनकुळेंवर नागपूर पदवीधर मतदारसंघाची जबाबदारी

नागपूर : विधानसभा निवडणुकीत डावलले गेलेले भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंवर पक्षाकडून पुन्हा नवी जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निवडणुकांसाठी नागपूर पदवीधर निवडणूक प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. यापूर्वी विधानसभा निवडणुकीत त्यांच्यावर पूर्व विदर्भाच्या प्रचाराची जबाबदारी होती. 

राज्यातील ५ पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांचं बिगुल वाजले आहे. या निवडणुकांसाठी सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळेंवर भाजपकडून नवी जबाबदारी सोपवली आहे. यानुसार बावनकुळेंची नागपूर पदवीधर निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Post a comment

0 Comments