वसमत स्टेट ऑफ इंडिया या बँकेला संभाजी ब्रिगेड च्या वतीने घेराव घालण्यात आला.


 हिंगोली, दि.५ गुरुवार:  वसमत येथील बँकेत पीक कर्ज घेण्यासाठी दलाल शेतकऱ्यांना कडून पैसे घेत होते त्या संदर्भात संभाजी ब्रिगेड वसमत यांच्या कडे काही शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केली होती त्या पार्श्वभूमीवर आज वसमत येथील शाखा व्यवस्थापक याना संभाजी ब्रिगेड च्या जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील जाधव महागावकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्त्यांनी घेराव घालत त्याना चांगलाच दम दिला.  शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येता कामा नये अश्या सूचना देखील केल्या.बँक कर्मचारी हे ग्राहकांना वेठीस धरतात असा आरोप हि उपस्थित ग्राहकांनी केला.
ज्यांना कर्ज माफी चा लाभ झाला त्यांना नविन कर्ज बँकेने द्यावे असे आदेश असताना देखील चार महिन्यापासून पिक कर्जाच्या फाईल धुळ खात होत्या .
कागदोपत्री घोडे नाचून शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.
बँक अनावश्यक कागदपत्रे मागून शेतकऱ्यांचा वेळ वाया घालत होती, शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज मिळत नव्हते, दलाल पैसे घेऊन बँकेत कर्ज काढून देतो म्हणून शेतकऱ्यांना फसवित होते, शेतकऱ्यांना बँकेत प्रवेश करण्यासाठी पूर्ण दिवस बँके समोर रांगेत उभे रहावे लागत असे अश्या प्रकारच्या अनेक अडचणी शेतकऱ्यांना येत होत्या म्हणून त्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी शेतकऱ्यांना घेऊन संभाजी ब्रिगेडच्या वतीने शाखा व्यवस्थापक यांना घेराव घालण्यात आला.
दलालांनी वेळीच आपला पसारा आवरता घ्यावा अन्यथा गाठ संभाजी ब्रिगेडशी आहे असा सज्जड दम दलालांना दिला गेला.
यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील महागावकर, संभाजी ब्रिगेड विधानसभा अध्यक्ष अलोक इंगोले सह अनेक शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a comment

0 Comments