बहुजन समाजाला आरक्षण दिलं, आज मराठा समाजाला का नाही - खासदार संभाजीराजे

नांदेड : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन सरकारला जाब विचारला आहे. “शाहू महाराजांनी २०० वर्षांपूर्वी बहुजन समाजाला आरक्षण दिलं. केवळ मराठ्यांना दिलं नाही. त्यावेळच्या बहुजनांमध्ये मराठा समाजाचाही समावेश होता. मात्र, आज मराठा समाज प्रवाहाच्या बाहेर का? मराठा समाजाला आरक्षण का नाही?” असा सवाल संभाजीराजे यांनी विचारला आहे. ते नांदेडमध्ये एका सभेत बोलत होते.
खासदार संभाजीराजे म्हणाले, “शाहू महाराजांनी २०० वर्षांपूर्वी बहुजन समाजाला आरक्षण दिलं. त्यांनी केवळ मराठ्यांना आरक्षण दिलं नाही. त्यावेळच्या बहुजन समाजातही मराठा समाजाचा सहभाग होता. मग आज मराठा समाज मुख्यप्रवाहात का नाही? का मराठा समाजाला आरक्षण दिलं जात नाही. त्यामुळे माझा लढा केवळ मराठा समाजासाठी नाही, तर माझा लढा संपूर्ण बहुजन समाजासाठी आहे.”

Post a comment

0 Comments