भारतात कसा असणार कोरोना लस वितरणाचा प्लॅन, केंद्रीय आरोग्यमंत्री

नवी दिल्ली : संपूर्ण जगाचं लक्ष सध्या कोरोना लसीवर  आहे. भारतात काही लसींची चाचणी अंतिम टप्प्यावर आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने लस नक्की कधी येईल? असा प्रश्न सर्वसामान्यांना सतावतोय. या प्रश्नाचं उत्तर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिलं आहे. देशात २०२१ च्या पहिल्या तीन महिन्यात लस उपलब्ध होईल, असं हर्षवर्धन यांनी सांगितलं आहे.
कोरोनाविरोधाच्या लढाईचा हा अकारावा महिना आहे. जगभरात एकूण २५० लसींच्या कंपन्या आहेत. यापैकी ३० कंपन्यांची नजर भारतावर आहे. देशात सध्या पाच लसींची चाचणी सुरु आहे. २०२१ च्या पहिल्या तीन महिन्यात आपल्याकडे लस उपलब्ध होईल. सप्टेंबर २०२१ पर्यंत २५ ते ३० कोटी भारतीयांना लस देण्यात आली असेल”, असा दावा हर्षवर्धन  यांनी केला आहे.

Post a comment

0 Comments