सुलतानपुर येथील राज्यमहामार्गावरील पुलावरून कार ५० फुट नादित कोसळून दोन युवक जागीच ठार .

 सुलतानपुर, दि.६ शुक्रवार : वाशिम येथून पुण्याला  जाणाऱ्या युवाकांच्या कार क्रमांक MH ३२ AH ४३६९ ला लोणार तालुक्यातील सुलतानपुर येथील राज्यमहामार्गावरील सितान्हाणी पुलाच्या वळण मार्गावर वेगात असलेली कार ५० फुट नादित कोसळून कार  तिन वेळेस पलटी होवून भीषण अपघात झाल्याची घटणा दिनांक ४ ला रात्री २ वाजताच्या दरम्याण घडली.तर कारमध्ये असलेले योगेश दत्ता अंभोरे वय ३० व अजय शंकर इंगोले वय ३२ वर्ष हे जागीच ठार झाले.  तसेच गणेश रमेश वाघ वय २८ वर्ष व ऋषीकेश दत्तात्र्य अदमाणे वय २७ हे गंभीर जख्मी झाले आहेत .मागील तिन वर्षापासुन पंढरपुर - शेगांव पालखी मार्गाचे काम सुरु असून अपघात स्थळ जवळील नदिपुलाजवळील काम करणे बाकी असून महामार्गा कुठल्याही प्रकारचे सुचना फलक नसल्याने वाहन चालकास रसत्याचा अंदाज येत नसल्याने हा अपघात झाला असावा असे बोलल्या जात आहे.

Post a comment

0 Comments