विविध कार्यक्रमांव्दारे बळीराजा गौरव दिन साजरा

नाशिक : महापुरुषांनी मांडलेला संघर्षाच्या इतिहासाला उजाळा देणे आणि कष्टकरी बहुजनांचे प्रबोधन जनतेच्या मुक्तीदायी चळवळीसाठी आवश्यक आहे. यानिमित्ताने त्यांची वर्ग, वर्ण, जाती आणि लिंगभावविरोधी व्यापक एकजूट उभी करणे यासाठी बळीराजाचे स्मरण बळीराजा गौरव दिनी विविध कार्यक्र मांतून करण्यात आले.
संविधानप्रेमी नाशिककर समितीच्या वतीने बलिप्रतिपदेनिमित्त बळीराजाला अभिवादन करण्यासाठी बळीराजा गौरव दिन महोत्सवाचे आयोजन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत करण्यात आले आहे. या निमित्ताने बळीराजाची भव्य रांगोळी काढण्यात आली. तसेच ‘संविधान जागर’ हा विद्रोही गाण्यांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. ‘बळीराजाचा इतिहास आणि आज’ या विषयावर परिवर्तनवादी साहित्यिक महादेव खुडे यांनी मार्गदर्शन केले. सिंधुसंस्कृती ही बहुजनांची आद्य स्त्रीसत्ताक कृषक संस्कृती होती. ज्यात स्वातंत्र्य, समता, मित्रता या मूल्यांची जोपासना केली जात असे. या सिंधु संस्कृतीचा महत्तम वारसदार बळीराजा असल्याचे खुडे यांनी सांगितले. बळीराजा गौरव दिन घराघरात साजरा होण्यासाठी शेतकरी, परिवर्तनवादी, संविधानप्रेमी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Post a comment

0 Comments