कापूस खरेदी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्याची लूट प्रहार संघटना आक्रमक  फुलंब्री - तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्यावर सतत च्या पावसामुळं आस्मानी संकट वोढवले असून पुन्हा परवाने नसलेल्या व्यापाऱ्यांनकडून मापात पाप करून शेतकऱ्याकडून कवडीमोल भावात कापूस खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांवर सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे, शासनाने लांब धाग्यासाठी 5825 तर माध्यम साठी 5515 असा  प्रति क्विंटल दर जाहीर केला आहे परंतु व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याच्या आर्थिक मजबुरीचा फायदा घेत3800 ते 4500  प्रतिक्विंटल दराने खरेदी करत शेतकऱ्याची पिळवणूक केली जात आहे 
  शेतकरी वडोद बाजार , टाकळी कोलते, बाबरा , तळेगाव, पीरबावडा, या छोट्या बाजारात शेतकरी कापूस विक्री साठी आणत आहे याचाच फायदा घेत व्यापारी आपल्या मर्जीप्रमाणे वाटेल त्या भावात कापूस खरीदी करत आहे, ही लूट तक्ताळ थाबवत त्याच्यावर कारवाई करण्यात यावी व लवकरात लवकर शासकीय कापूस खरेदी केंद्र चालू करण्यात यावे याबाबत प्रहार संघटनेच्या युवा तालुका उपाध्यक्ष राहुल पाटील काकडे यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे व अन्यथा प्रहार संघटनेचे जिल्हाअध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली काटे बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला, यावेळेस प्रहार ता. संपर्क प्रमुख राम गाडेकर पाटील,  प्रहार शेतकरी स. कार्याध्यक्ष गजानन कोलते , बाबरा सर्कल अध्यक्ष अजिंक्य काथार, युवा संघटक आकाश कोलते आदींची उपस्तिती होती

Post a comment

0 Comments