राज्यात थंडी वाढली

.

 पुणे, दि. ५ गुरुवार  :  गेल्या पाच ते सहा दिवसांपासून गारठा वाढत असल्याने राज्यात हळूहळू थंडीची चाहूल लागली आहे. राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आता थंडीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होत आहे. येत्या काही दिवसांत राज्यात थंडी काही प्रमाणात वाढणार आहे. बुधवारी (ता. ४) सकाळी आठ वाजेपर्यंत यवतमाळमध्ये १२ अंश सेल्सिअसची किमान तापमानाची नोंद  झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.सध्या वातावरणात धुरकटपणा वाढला आहे. त्यामुळे जमिनीवर कमी सूर्यप्रकाश येतो व दिवसाचेही तापमान कमी होताना दिसत आहे. येत्या काही दिवसांत मराठवाडा विभागातील औरंगाबाद जालना, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर येथे जी तापमानात घट झाली आहे. त्यात आणखी घट होण्याची शक्यता असून, येत्या दोन ते तीन दिवसांत आणखी थंडी वाढेल.विदर्भात अमरावती, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वाशीम या भागात जास्त थंड वारे वाहतील. त्यामुळे या भागातही अजूनही थंडी वाढण्याची शक्यता आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली येथे किमान तापमानात कमालीची घट होईल. कोकणात पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, उपनगर, ठाणे येथे थोड्या प्रमाणात थंडी वाढेल. पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, नगर या भागांमध्ये थंडीची तीव्रता वाढेल.विदर्भाच्या अनेक भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उणे सात अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाले आहे. त्यामुळे विदर्भातील यवतमाळसह, गोंदिया, चंद्रपूर, अमरावती, बुलडाणा, नागपूर, वर्धा या सर्वच जिल्ह्यांत किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे. चंद्रपूर येथे सरासरीच्या तुलनेत उणे सात अंश सेल्सिअसने घट होऊन १२.२ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली आहे.मराठवाड्यातही गारठा चांगलाच वाढत असून, किमान तापमानात घट होऊ लागली आहे. परभणी येथे १४.० अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमान नोंदविले गेले. तर नांदेड,  उस्मानाबाद, औरंगाबाद, बीड या भागांतील किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे, जळगाव, पुणे येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उणे तीन अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. तर पुण्यात १५.१ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमान नोंद झाली. कोकणात किमान तापमानात घट होऊ लागल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  

Post a comment

0 Comments