पुष्पगुच्छ, हार-तुऱ्यांसाठी ४० लाख

ठाणे : महापालिकेतील छोटय़ा-मोठय़ा समारंभांबरोबरच पाहुण्यांना पुष्पगुच्छ, हार-तुरे, फुले, तुळशीचे रोप असे साहित्य देण्यासाठी दररोज साडेपाच हजार रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. या प्रस्तावानुसार दोन वर्षांसाठी तब्बल ४० लाख रुपयांचे कंत्राट देण्यात येणार आहे, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केला आहे. तसेच या प्रस्तावाला त्यांनी आक्षेप घेतला आहे.
महापालिकेतील विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, समारंभ, उपक्रमांसाठी आणि पदाधिकारी-अधिकारी यांना पुष्पगुच्छ, तुळशी रोप, हार- तुरे, फुलांची सजावट करण्यासाठी निविदा मागविण्यात आली होती. मात्र दोन वेळा मुदतवाढ देऊनही केवळ एकाच कंत्राटदाराने निविदा भरली होती. या कंत्राटदाराने दोन वर्षांसाठी ४० लाख रुपये आकारले आहेत.

Post a comment

0 Comments