शिवसेनेने धमकीची भाषा वापरू नये, मी सुध्दा चळवळीतला कार्यकर्ता. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेला थेट इशारा.

शिवसेनेने धमकीची भाषा वापरू नये, मी सुध्दा चळवळीतला कार्यकर्ता.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेला थेट इशारा.

पंढरपूर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला थेट इशारा दिला आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, शिवसेनेने धमकीची भाषा वापरू नये. मी सुद्धा चळवळीतील कार्यकर्ता आहे, अशा शब्दात पाटील यांनी शिवसेनेला खडसावले आहे. तसेच, तर चंद्रकांत पाटील नावाची गोळी विरोधकांना दिवसातून पाच वेळा घेतल्याशिवाय झोपच येत नाही, अशी टीका सुध्दा चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

सांगोला इथे चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पुणे पदवीधर शिक्षक मतदारसंघ कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते.यावेळी, चंद्रकांत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष झाले असले तरी त्यांनी सर्वच ठिकाणी अपयशी आले आहे, असे पाटील म्हणाले आहे. 

आज मेळाव्या आधी चंद्रकांत पाटील यांनी शेकापचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार गणपतराव देशमुख यांची भेट घेतली. देशमुख यांच्या सोलापुरातील सांगोला इथल्या निवासस्थानी ही भेट झाली. पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे अरुण लाड भाजपचे संग्रामसिंह देशमुख आणि मनसेच्या रुपाली पाटील-ठोंबरे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.

Post a comment

0 Comments