भाजप आध्यात्मिक आघाडीकडून बेमुदत ठिय्या आंदोलन

कोल्हापूर:- दार उघड उद्धवा, दार उघड’ म्हणत गुरुवारी भाजप आध्यात्मिक आघाडीकडून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आलं होतं.
या आंदोलनाला तुळजापूर पोलिसांनी परवानगी नाकारली होती. पण, तरीही तुषार भोसले आणि राज्यातील साधू-महंतांच्या नेृत्वात हे आंदोलन सुरु करण्यात आलं होतं.
त्यानंतर नगर परिषदेने आंदोलन स्थळावरील तंबू रातोरात उखडून टाकले. तसेच तुषार भोसले यांना तुळजापूर पोलिसांनी नोटीसही बजावली.
इतकंच नाही तर तुळजापूर मंदिर परिसरात जमावबंदी लागू केली. त्यामुळे तुषार भोसले यांनी महाविकास आघाडी सरकारवर घणाघात करत सरकारची तुलना मुघलांशी केली.

Post a comment

0 Comments