मोदींनी जवान आणि किसान यांना एकमेकांविरोधात उभं केलं; राहुल गांधींचा हल्लाबोल

नवी दिल्ली:- राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला आहे. दिल्लीच्या वेशीवर गेल्या तीन दिवसांपासून शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापट सुरू आहे. केंद्राच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरियाणातील शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहेत. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या 'दिल्ली चलो' आंदोलनाला बळाच्या जोरावर थोपविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. 
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज एक फोटो ट्विट करुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. फोटोत एक जवान शेतकऱ्यावर लाठीचार्ज करतानाचा हा फोटो अतिशय दुर्दैवी फोटो असल्याचं राहुल यांनी म्हटलंय. ''आपण आजवर जय जवान, जय किसान असा नारा ऐकत आलो आहोत. पण आज पंतप्रधान मोदींच्या अहंकाराने जवान आणि किसान एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. हे खूप धोकादायक आहे'', असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

Post a comment

0 Comments