लॉकडाऊनमध्ये जुळलं प्रेम,ऑगस्टमध्ये लग्न आणि ऑक्टोबरमध्ये हत्या

मध्य प्रदेश- इंदूर शहरात धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे लॉकडाउनदरम्यान एक तरुण-तरुणी प्रेमात पडले..त्यानंतर ऑगस्टमध्ये त्यांचं लग्नही झालं. यानंतर ऑक्टोबर महिन्यात या दोघांमधील वाद इतका वाढला की रात्री पतीने पत्नीची हत्या केली. यानंतर पती स्वत: पोलीस ठाण्यात गेला व त्याने आपला गुन्हा कबूल केला.
ही घटना इंदूरमधील संयोगितागंज पोलीस ठाणे हद्दीतील आहे. येथे कुटुंबातील वादातून नवविवाहित दाम्पत्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. मिळालेल्या माहितीनुसार पतीने कुत्र्याच्या साखळीने पत्नीची गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतू जेव्हा त्याला जमलं नाही, त्यानंतर त्याने सुऱ्याने २२ वर्षीय पत्नीची हत्या केली. यानंतर आरोपी पतीने स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा कबूल केला

Post a comment

0 Comments