टाळी, थाळी वाजवून, दिवे लावून आणखी कोरोना वाढला.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची घणाघाती टीका.

टाळी, थाळी वाजवून, दिवे लावून आणखी कोरोना वाढला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची घणाघाती टीका.

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. जयंत पाटील म्हणाले की, टाळी, थाळी वाजवून, दिवे लावून देशातील कोरोना जाण्याऐवजी उलट वाढला आहे, असे पाटील म्हणाले आहे. देशाच्या पंतप्रधानांचा निर्णय म्हणून आपण जे जे केले, त्याने कोरोनावर नियंत्रण राहिले नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मंदिरे उघडण्यासाठी घंटानाद आणि राज्य सरकारचा निषेध करणार्‍या भाजपाने कोरोनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, असा खणखणीत टोला जयंत पाटील यांनी भाजपला लगावला आहे.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ आज गुरूवारी शहरातील शुभमंगल कार्यालयात आयोजित पदवीधर व कार्यकर्ता जिल्हा मेळावा आयोजीत करण्यात आला होता. यावेळी, पाटील बोलत होते. व्यासपीठावर ग्रामविकासमंत्री अब्दुल सत्तार, अर्जून खोतकर, राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी मंत्री मधुकर चव्हाण, शिक्षक आमदार विक्रम काळे, ज्येष्ठ नेते जीवन गोरे, शिवसेनेचे आमदार कैलास पाटील, माजी आमदार राहुल मोटे, माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड आदीची उपस्थिती होती.

जयंत पाटील पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार संयमाने निर्णय घेऊन कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, सर्वसामान्यांची काळजी नसणारे विरोधक मंदिरे उघडा, शाळा उघडून गर्दी वाढवून कोरोना वाढविण्यावर भर देत असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी भाजपवर केला आहे. माञ, राज्य सरकार विरोधकांकडे फारसे लक्ष न देत नाही. उपाययोजना करून सामान्यांना दिलासा देण्याचे काम राज्य सरकार करत आहे, असे पाटील म्हणाले.

सतीश चव्हाण यांनी विद्यार्थांचे प्रश्न मांडले : जयंत पाटील यांनी सतीश चव्हाण यांनी केलेल्या कामाची यादीच यावेळी मतदारांसमोर ठेवली. जयंत पाटील म्हणाले, मराठवाडा पदवीधर मतदार संघातील उमेदवार सतीश चव्हाण यांनी मागील दोन्ही कार्यकाळात पदवीधरांचे प्रश्न मांडण्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. विनाअनुदानित शाळांचे प्रश्न असो, महापरीक्षा पोर्टल बंद करणे, वैद्यकीय महाविद्यालय प्रवेशाचा ७०:३० चा फॉर्म्यूला रद्द करणे असो, नीटचे परीक्षा केंद्र सुरू करणे,शिक्षक, प्राध्यापक व पदवीधरांचे प्रश्न आमदार सतीश चव्हाण यांनी सभागृहात मांडून आपली कामगिरी दाखवून दिली आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले आहे. त्यामुळे, सतीश चव्हाण मोठ्या मताधिक्याने विजयी होणार आहे, असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

Post a comment

0 Comments