कर्तव्य बजावताना बोनेटवर फरफटत नेलेल्या ” त्या ” वाहतूक पोलिसाचा गृहमंत्र्यांनी केला सत्कार.

पिंपरी चिंचवड मध्ये मास्क विचारल्याचा राग आल्याने बोनेटवर टाकून एक किलोमीटर अंतरापर्यंत फरफटत नेलेले वाहतूक पोलीस आबासाहेब सावंत यांच्या  कार्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कौतुक केले. कर्तव्यावर असताना एका चालकाने सावंतांना ठोकर दिली, तेव्हा ते बोनेटवर पडले होते. अशा परिस्थितीत त्या चालकाने एक किलोमीटर अंतर सुसाट गाडी पळवली होती. यावेळी मदतीला धावलेलल्या प्रत्यक्षदर्शीं तरुणांसह काही रिक्षा चालक आणि कार चालक यामुळे चालकाला बेड्या ठोकण्यात आणि वाहतूक पोलिसाचा जीव वाचवण्यात यश आले होते. याचा थरार कॅमेऱ्यातून सर्वांसमोर आला. त्यानंतर आज गृहमंत्री देशमुखांनी सावंतांना मुंबई बोलवून त्यांचं कौतुक केलं. यावेळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश ही उपस्थित होते.

Post a comment

0 Comments