भोकरगाव येथील स्वस्त धान्य दुकान बंद करण्यासाठी गावकऱ्यांचे तहसीलदार यांना निवेदन.वैजापूर, दि. ५ गुरुवार  : वैजापूर तालुक्यातील भोकरगाव येथील खातेधारक गावकऱ्यांनी गावातील स्वस्त धान्य दुकान क्रमांक 63 चोकशी करून बंद करण्यासाठी तहसीलदार वैजापूर यांना निवेदन दिले.

सविस्तर वृत्त असे की वैजापूर तालुक्यातील भोकरगाव येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक 63 यांनी उच्च न्यायालयाचे निर्देश पत्र दुकानात लावलेले नसून योग्य त्या किंमतीनुसार धान्य वितरण करत नसल्याने तसेच कार्डधारक कैलास जाधव यांनी पावती हवी म्हणून हट्ट धरल्याने धान्य दुकानदार जाधव यांनी मारहाण करून हुसकावून लावण्याचा प्रकार येथे घडला असून कार्डधारक यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात स्वस्त धान्य दुकानदारांची चौकशी करून दुकानाची परवानगी रद्द करण्यात यावी अशी मागणी केली आहे.या निवेदनावर आण्णा पवार,कैलास जाधव,भोपळे,कनगरे,राजीव पवार, ज्ञानेश्वर भोपळे सह इतर कार्डधारक यांच्या सह्या आहेत.

Post a comment

0 Comments