अहमद पटेल कामालीचे चाणाक्ष, बुध्दिमान नेते होते.मनसे अद्धक्ष राज ठाकरे यांनी अहमद पटेलांना श्रद्धांजली अर्पण केली.

अहमद पटेल कामालीचे चाणाक्ष, बुध्दिमान नेते होते.
मनसे अद्धक्ष राज ठाकरे यांनी अहमद पटेलांना श्रद्धांजली अर्पण केली.

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे बुधवारी पहाटे गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. पटेल यांच्या निधनानंतर महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्दक्ष राज ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. 

अहमद पटेल कामालीचे चाणाक्ष, बुध्दिमान नेते होते. राजकारणाला बुद्धिबळाच्या पटावर ठेवून डाव-प्रतिडाव खेळण्यात ते माहीर होते, अशा शब्दात राज ठाकरे यांनी अहमद पटेलांना श्रद्धांजली अर्पण केली.

राज ठाकरे यांनी टि्वटवर पोस्ट लिहीत अहमद पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली. राज ठाकरे टि्वटवर लिहीतात की, अहमद पटेल कामालीचे चाणाक्ष, बुध्दिमान नेते होते. 

राजकारणाला बुद्धिबळाच्या पटावर ठेवून डाव-प्रतिडाव खेळण्यात ते माहीर होते. पण ही असाधारण क्षमता त्यांनी राजकीय लढाया जिंकण्यापुरतीच वापरली, तिला कधी त्यांनी व्यक्तिगत हेवेदावे ह्यासाठी वापरलं नाही, असे राज ठाकरे म्हणाले आहे. 

तसेच, खंडप्राय देशाच्या कानाकोपऱ्यातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांशी पटेलांचे सलोख्याचे संबंध होते, असे राज यांनी सांगितले. राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांचा एखाद्याशी स्नेह तयार झाला की त्या व्यक्तीच्या व्यक्तिगत आयुष्यातील सुख-दु:खांच्या प्रसंगात ते ठाम उभे राहत, ह्याचा अनुभव मी देखील घेतला आहे, असे राज यांनी लिहीले आहे. 

43 वर्ष सक्रिय राजकारणात राहून, आणि अहमद पटेल ह्यांचं निवास्थान अनेक सत्तांतराचं केंद्रस्थान होऊन देखील स्वत: सत्तेच्या पदांच्या मोहात न पडणं हा गुण दुर्मिळच,असे राज म्हणाले आहे. तसेच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अहमज पटेल यांना विनम्र श्रद्धांजली.

Post a comment

0 Comments