नागपूरमध्ये फटाके व्यावसायिकांची संख्या घटली

कोव्हिड संदर्भातील नियमांसह अग्निसुरक्षा नियमांचेही पालन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. फटका विक्रीची परवानगी मागणाऱ्यांची संख्येत 20 ते 30 टक्के घट झाल्याचे चित्र आहे.दिवाळी म्हटलं की फटाके आले मात्र यावर्षी कोरोनामुळे अनेक निर्बंध लागले आहेत. येत्या दिवाळीसाठी संपूर्ण नागपूर शहरात तयारीला सुरूवात झाली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावात संपूर्ण सुरक्षेची काळजी घेउन मनपातर्फे शहरातील व्यावसायिकांना परवानगी देण्यात येत आहे. दिवाळीमध्ये सर्वाधिक मागणी असलेल्या फटाक्यांसंदर्भात विस्फोटक अधिनियमांन्वये नागपूर महानगरपालिकेतर्फे दुकानांना परवानगी देण्यात येते.

Post a comment

0 Comments