इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद (सल.) यांच्या विरोधात आपत्तीजनक वक्तव्य.


पैठण - पैठण येथील विविध धर्मिक सामाजिक तसेच राजकीय संघटनांच्या वतीने फ्रान्स मध्ये इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद यांच्या बद्दल अवमानकारक टीका केली असल्याने पैठण येथे फ्रान्स राष्ट्राध्यक्षाविरोधात शहरे काजी फजलुल्लाह, मो.हानिफ कट्यारे, व कॉंग्रेस चे शहराध्यक्ष तथा गटनेता हसनोद्दीन कट्यारे, यांच्या मार्गदर्शना खाली निषेध व्यक्त करून पैठण तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना निवेदन देण्यात आले. 
निवेदनात म्हटले आहे की, दया आणि करुणाचे सागर प्रेषित मोहोम्मद यांच्या बद्दल वादग्रस्त जाणीवपूर्वक आपत्तीजनक साहित्य प्रसिद्ध करून मुस्लिमांच्या भावना दुखावण्याचा काम फ्रान्स सरकार करीत आहे. दोषींवर कार्यवाही करण्याऐवजी फ्रान्स चे अध्यक्ष यांनी दोषींची पाठराखन केली. 


हे अत्यंत चिंताजनक असल्याने फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षानी समस्त मुस्लिम समाजाची माफी मागावी. तसेच भारत सरकारने फ्रान्सला ताकीत देऊन फ्रान्स सोबतचे संबंध तोडून आयात निर्यात बंद करून फ्रान्स वर कार्यवाही करण्यात यावी अश्या आशयाचे निवेदन देण्यात आले आहे. 
यावेळी जमियत उलेमा हिंन्द , जमाते इस्लामी, राहे लिल्लाह फाउंडेशन, बहुजन मुक्ती मोर्चा, बामसेफ, आदी संघटनांनी निषेध नोंदवला. यावेळी मुफ्ती अ. रज्जाक, रफिक कादरी, अजीम कट्यारे, मो.सिराज, अंजर कादरी, अँड.इम्रान शेख, हमीद सर, मोतीलाल घुंगसे, हरूनभाई शेख, रमेश गव्हाणे, नंदकिशोर मगरे, संजय खडसन,  काजिकलीमुल्ला, इस्माईल नगरकर, मौलाना मन्सूर, मौलाना अकबर, मौलाना अन्सारी आदी उपस्थित होते.

Post a comment

0 Comments