पुण्यात तरुणाने विवाहितेच्या चेहऱ्यावर फेकले अ‍ॅसिडसारखे केमिकल.

पुणे : माहेरी आलेल्या विवाहितेस भेटण्यासाठी बोलावून तरुणाने तिच्यावर अ‍ॅसिडफेकल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या घटनेत विवाहित तरुणीचा चेहरा भाजला असून तिला तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना सोमवारी सकाळी आठ वाजता पर्वती दर्शन येथे घडली. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व अबुझर यांची एकमेकांशी चांगली ओळख होती. आठ महिन्यांपूर्वी फिर्यादीचे त्यांच्या नात्यातील एका मुलासमवेत विवाह झाला होता. त्यानंतर ती तिच्या सासरी नांद होती. दरम्यान, दिवाळीच्या सुट्टीनिमित्त विवाहित तरुणी तिच्या पतीसमवेत माहेरी आली होती. सोमवारी सकाळी अबुझर याने फिर्यादीला भेटण्यासाठी बोलाविले. त्यानुसार, तरुणी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पर्वती दर्शन येथील भांबरे शाळेजवळ असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या परिसरात त्यास भेटण्यासाठी गेली. त्यावेळी तरुणीने त्यास "आता तु माझ्या नादी लागू नको, माझे लग्न झाले आहे' असे समजाविले. मात्र अबुझर याने रागाच्या भरात तिच्याशी भांडणे सुरू केली. "तुझे अपने आप पर गुरुर है ना, देख मै तेरा गुरूर कैसे तोडता हूँ' असे म्हणत त्याने त्याच्या हातामध्ये लपवून ठेवलेले असिडसारखे द्रव्य फिर्यादीच्या चेहऱ्यावर टाकले. त्यामध्ये फिर्यादीच्या चेहऱ्याचा डावा भाग भाजला. गंभीर जखमी झालेल्या फिर्यादीला तिच्या कुटुंबीयांसह व स्थानिक नागरिकांनी उपचारांसाठी तत्काळ ससून रुग्णालयात दाखल केले.

Post a comment

0 Comments