वीजबिले फाडून मुख्य अभियंत्यांवर भिरकावले. वीजबिल वाढीविरोधात मनसे आक्रमक.

वीजबिले फाडून मुख्य अभियंत्यांवर भिरकावले.
वीजबिल वाढीविरोधात मनसे आक्रमक.

औरंगाबाद : महावितरणकडून वीज ग्राहकांना देण्यात आलेली वाढीव वीज बिले रद्द करण्याच्या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. 
मंगळवारी मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे, सतनामसिंग गुलाटी आदी पदाधिका-यांनी महावितरणचे मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांच्या अंगावर विजेचे बिल फाडून भिरकावले. तसेच वाढीव बिले ग्राहक आता भरणार नाहीत असे महावितरणच्या अधिका-यांना ठणकावून सांगितले.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यापासून देशभरात लॉक डाऊन सुरू होते. 
लॉक डाऊनमुळे सर्वसामान्य नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यातच महावितरण कडून 17 टक्के जादा दराने विज बिल देण्यात आल्यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी आहे. 
महावितरणच्या विरोधात मंगळवारी मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी अभियंत्यांना वाढीव विज बिलासंदर्भात जाब विचारत धारेवर धरले. 

तसेच अधिकारी कोणतेही उत्तर न दिल्याने दाशरथे यांनी अभियंता खंदारे यांच्या दिशेने विज बिले फाडून भिरकावली. तसेच येत्या 26 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर वाढीव विज बिले रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी मनसेच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे.

Post a comment

0 Comments