अवैध गौणखनिज उत्खनन प्रकरणी अधिकारी व आर.के.सी कंपनी विरुद्ध उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल


फुलंब्री - 
औरंगाबाद- जळगाव (सिल्लोड) राष्ट्रीय महामार्ग क्रं ७५३एफ कॉन्ट्रॅक्टर आर के चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी पुणे शाखा पाथ्री या कंपनीने रस्त्याचे काम घेतले असून मौजे पाथ्री ता. फुलंब्री येथील गायरान जमिन गट क्रं.130 मध्ये 2000 ब्रासची परवानगी दिलेली असताना त्यामधून जवळपास 5000 ब्रास पेक्षा अधिक मुरूम उत्खनन झालेले दिसून येत आहे, तरी गायरान गट क्रं.138,145 या दोन्ही गटांची परवानगी नसताना त्यामधून लाखो ब्रास अवैध मुरूम उत्खनन व झाडांची कत्तल करून नालाबंडिंग तोडून लाखो ब्रास गौण खनिज चोरी केल्या बाबत विभागीय आयुक्त औरंगाबाद, जिल्हाधिकारी औरंगाबाद, उपविभागीय अधिकारी फुलंब्री-पैठण, तहसीलदार फुलंब्री यांना लेखी तक्रार देण्यात आली होती,मात्र या प्रकरणी ठोस दंडात्मक कारवाई न झाल्याने मा.उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. 
 याचिकाकर्ते अजहर अन्वर सय्यद यांनी वेळोवेळी पुराव्यानिशी विभागीय आयुक्त ,जिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी पैठण फुलंब्री, तहसीलदार यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. परंतु संबंधित अधिकारी यांनी पंचनामा करण्यास टाळाटाळ केली.संबंधित अधिकारी यांनी कोणतीही चौकशी न करता फक्त बघ्याची भूमिका घेतली संबंधित दोषींना पाठीशी घालण्याचे काम केले. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे याचिकाकर्ते यांनी वकील श्री.ॲड.कानडे अंगद.एल.यांच्या मार्फत मा.उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद जनहित याचिका क्रंं.पीआयएलएसटी/१९९७७/२०२० दाखल केली आहे.

Post a comment

0 Comments