स्वतंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या...केशरिया हिंदूवाहिनीची मागणी,गगापुर प्रतिनिधी (प्रकाश सातपुते) 

पंतप्रधान,मुख्यमंत्री यांना प्रस्ताव पाठवाण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन...डॉ .शितल अग्निहोत्री....

अखंड भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेक स्वातंत्र्यवीरांनी भारत देशासाठी आपल्या जीवाचे  बलिदान दिले आहे त्यातच स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकर याना भारत सरकारने भारतरत्न ही उपाधी द्यावी म्हणून केशरिया हिंदू वाहिनी संघटनेच्या वतीने आज औरंगाबादचे जिल्हाधिकारी  सुनील चव्हाण यांना निवेदन देण्यात आले व त्यांच्या मार्फत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,यांच्यापर्यंत केशरिया हिंदू वहिनीची ही मागणी पोहचवावी अशीही मागणी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
              दरम्यान यावेळी 
केशरिया हिंदू वाहिनीच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शीतल अग्निहोत्री,प्रदेश संगठन मंञी किशोर उदावंत, प्रदेश प्रचारीका कल्पना पांडे,जिल्हा अध्यक्ष विशाल राजे आदींसह पदाधिकारी यांची उपस्थिती  होती.

Post a comment

0 Comments