गौरी गडाख यांची आत्महत्या गळफास घेऊनच

अहमदनगर : राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी गडाख शनिवारी रात्री अहमदनगरमधील त्यांच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळल्या. गौरी गडाख यांचा मृतदेह राहत्या घरात आढळल्याची घटना नगर जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली. झाल्याप्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आज (रविवार) गौरी यांचा शवविच्छेदन अहवाल प्रात झाला असून त्यांनी गळफास घेतल्याचं शवविच्छेदन अहवालावरून स्पष्ट झालं आहे.
गौरी प्रशांत गडाख यांनी गळफास घेतल्याचे शवविच्छेदन अहवालावरुन स्पष्ट झालंय. सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे मात्र पोलीस तपास सुरु असून जे काही समोर येईल त्यानुसार गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिली आहे.

Post a comment

0 Comments