मराठा समाज आरक्षणावरील स्थगिती उठवूनच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी कार्तिक एकादशी महापुजेसाठी यावे.


 पंढरपूर, दि. १८ बुधवार : मराठा समाज आरक्षणावरील स्थगिती उठवूनच उपमुख्यमंत्री अजित दादा  पवार यांनी कार्तिक एकादशी महापुजेसाठी यावे.गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज आरक्षणसह आपल्या न्याय हक्काच्या मागण्या लोकशाहीच्या मार्गाने शांततेने व मोर्चे व आंदोलने केले आहेत.
तरीही राज्य सरकार व केंद्र सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही.आणि समाजाच्या न्याय हक्कासाठी मागण्या करूनही हे दोन्हीही सरकार सतत टाळाटाळा व दुर्लक्ष करीत आहे.आज वास्तविक मराठा विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फटका बसत आहे.गेल्या अनेक वर्षापासून नोकर भरतीतील मराठा आरक्षणाच्या माध्यमातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्त्याही दिल्या नाहीत.तर सध्या सुप्रिम कोर्टात मराठा आरक्षणाला स्थितीती दिली आहे.ती स्थितीती उठविण्यासाठी प्रत्यन केले नाही.यापुढे आमच्या न्याय हक्काच्या मागण्या बाबत केंद्र सरकारने व राज्य सरकारने सामाजिक हितासाठी मराठा समाज विद्यार्थ्यांना ठोकपणे निर्णय घेवून न्याय देण्यात यावे.जर राज्य सरकार आणि केंद्र सरकारने योग्य निर्णय नाही घेतलातर सकल मराठा समाज शांत बसणार नाही.या राज्य व केंद्र सरकाराला जागे करण्यासाठी सकल मराठा समाज आणि शिवस्वराज्य युवा संघटन महाराष्ट्र राज्य व छावा क्षात्रवीर सेना यांच्यावतीने कार्तिक एकादशीची महापुजा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना घेरावा घालणार.जो पर्यंत सरकार आमच्या हक्काचे आरक्षण देत नाही.  तो पर्यंत आम्ही पंढरपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामधून पुढे जावू देणार नाही.खरंच या महाराष्ट्रातील मराठा समाजातील सर्व आमदार आणि खासदार व विठ्ठल रुक्मिणी मातेची कार्तिक एकादशीची महापुजा करायची असेलतर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी पंढरपूरमध्ये येतांना मराठा आरक्षणावरची स्थगिती उठवून व महाराष्ट्र सर्व समन्वयक यांच्याशी चर्चा करण्याची तारीख जाहीर करून यावे.मराठा समाजला न्याय द्यावा.तरचं मराठा समाजा तुमचे स्वागत करेल.श्री.विठ्ठल रुक्मिणी मातेची कार्तिक एकादशीची महापुजा मनमोकळ्यापाणानी करावी.तरी महाराष्ट्रातील सकल मराठा समाज बांधवांनी आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी कार्तिक एकादशीला पंढरपूर येवून उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना श्री.विठ्ठल रुक्मिणी मातेची महापुजेच्या वेळी आम्ही घेरावा घालू असे निवेदन पंढरपूर उपविभागीय अधिकारी साहेब सचिन ढोले साहेब यांना देवून मागणी करण्यात आली आहे.यासाठी महाराष्ट्रातून सर्व समाज बांधवानी सामील व्हा.असे आव्हान सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक व शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे छावा क्षात्रवीर सेनेचे अध्यक्ष समाधान सुरवसे यावेळी निवेदन देताना मराठा समाजाचे युवक नेते नितीन करंडे, शिवस्वराज्य युवा संघटनेचे शहराध्यक्ष किरण शिंदे,विजय कदम,गणेश चव्हाण, नवशाक शिकलकर, नाटिळक विशाल शिंदे,इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a comment

0 Comments