कोरोना परिस्थिती लक्षात घेऊनच आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळा सुरु होणार-के.सी. पाडवी

नंदुरबार : राज्यात सोमवारपासून इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु झाले आहेत. मात्र, कोरोना संसर्ग आणि उपायोजना लक्षात घेऊनच आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळा सुरु होतील, अशी माहिती राज्याचे आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांनी दिली. 
कोरोनाविरोधाच्या लढाईचा हा अकारावा महिना आहे. जगभरात एकूण २५० लसींच्या कंपन्या आहेत. यापैकी ३० कंपन्यांची नजर भारतावर आहे. देशात सध्या पाच लसींची चाचणी सुरु आहे. २०२१ च्या पहिल्या तीन महिन्यात आपल्याकडे लस उपलब्ध होईल. सप्टेंबर २०२१ पर्यंत २५ ते ३० कोटी भारतीयांना लस देण्यात आली असेल”, असा दावा हर्षवर्धन  यांनी केला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळा १ डिसेंबरनंतर सुरू होतील. हा निर्णय घेण्यात आला असला तरी शासकीय आश्रम शाळा सुरू करताना कोरोना परिस्थिती लक्षात घेऊनच पुढील निर्णय घेण्यात येईल. तसेच, शाळा सुरु करताना कोरोनासंदर्भात कोणत्या उपायोजना करण्यात आल्या आहेत याचाही आढावा घेतला जाईल. त्यानंतर शासकीय आश्रमशाळा सुरु करण्यात येतील,” असे पाडवी म्हणाले. तसेच, यावेळी शाळा सुरु करण्यासाठी कुठल्याही प्रकारची घाई केली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.  

Post a comment

0 Comments