अमित चांदोळेंना ३ दिवसांची कोठडी, प्रताप सरनाईकांच्या अडचणीत वाढ.

अमित चांदोळेंना ३ दिवसांची कोठडी, प्रताप सरनाईकांच्या अडचणीत वाढ.
अमित चांदोळे तीन दिवस ईडीच्या ताब्यात राहणार असून त्यांची कसून चौकशी.

मुंबई - शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचे व्यावसायिक भागीदार अमित चांदोळे यांना २९ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे सरनाईकांना मोठा झटका बसणार आहे. चांदोळे तीन दिवस ईडीच्या ताब्यात राहणार असून त्यांची कसून चौकशी केली जाईल.

चांदोळे यांच्या चौकशीतून अनेक खुलासा होण्याची शक्यता आहे. टॉप्स ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काल अमित चांदोळे यांची ईडीने कसून चौकशी केली होती. 

त्यानंतर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. आज सकाळी ईडीने चांदोळे यांना कोर्टासमोर हजर केले असता चांदोळे यांना तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे. या तीन दिवसांत चांदोळे यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ईडी पुढील सूत्रे हलवणार असल्याचे सांगितले जात आहे.

टॉप्स सिक्युरिटी या ग्रुपविरोधातील आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्याप्रकरणी मंगळवारी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) प्रताप सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयांवर छापे टाकले होते. 

आता अमित चांदोळे यांच्या अटकेनंतर प्रताप सरनाईकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमित चांदोळे हे प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय समजले जातात.

Post a comment

0 Comments