कुठलीही वीजबिल माफी मिळणार नाही, उर्जामंत्री नितीन राऊतांचे स्पष्टीकरण.

कुठलीही वीजबिल माफी मिळणार नाही, असे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले आहे. वाढीव वीजबिलातून सवलत देणे अशक्य असल्याचे राऊत यांनी यापूर्वीच सांगितले होते.
मुंबई - कुठलीही वीजबिल माफी मिळणार नाही, असे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले आहे. वाढीव वीजबिलातून सवलत देणे अशक्य असल्याचे राऊत यांनी यापूर्वीच सांगितले होते.
लॉकडाऊनच्या काळात वीज ग्राहकांना वाढीव वीजबिले आली होती. हातात रोजगार नाही, त्यात वाढीव बिल आल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहेत.
सरकारकडून वीजबिलांत सवलत मिळेल अशी आशा होती, परंतु आता ऊर्जामंत्र्यांनी सवलत मिळणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला असून खिशाला कात्री लागणार आहे.
लॉकडाऊनच्या काळात आलेली बिले भरलीच पाहिजे. वीज वापरणारे जसे ग्राहक आहेत तसेच महावितरणही ग्राहक आहे. 
महावितरणला बाहेरुन वीज विकत घ्यावी लागते, विविध शुल्क द्यावे लागतात. कर्ज घेऊन मदत करत आहोत, कामकाज चालवण्यासाठी आम्हालाही मर्यादा आहेत. ग्राहकांना दिलासा मिळावा यासाठी मी पूर्ण प्रयत्न केले, परंतु केंद्र सरकारने यात मदत केली नाही. वीज बिल सवलतीचा विषय आता नाही, असे नितीन राऊत यांनी सांगितले.
लॉकडाऊनच्या काळात वीज बिल ग्राहकांना अव्वाच्या-सव्वा बिले आली. वीज बिलात सवलत मिळावी म्हणून ग्राहकांना मनसेने आंदोलन केले. 
दरम्यानच्या काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची याबाबत भेट घेतली. त्यानंतर दिवाळीआधी वीज बिलात सवलत देणार असल्याचे संकेतही नितीन राऊत यांनी दिले होते. पण याबाबत कोणताच निर्णय झाला नाही. 
शिवाय कॅबिनेट बैठकीत कोणता प्रस्ताव आला नाही. त्यात महावितरणने वीज बिल वसुलीचे आदेश काढले. आता कोणताही दिलासा मिळणार नसल्याने वीज बिलाचा भार ग्राहकांवरच पडणार आहे.

Post a comment

0 Comments