महाविकास आघाडी कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक एकञ लढणार.

महाविकास आघाडी कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक एकञ लढणार.
राष्ट्रवादीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांनी केली घोषणा.

ठाणे : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी एकञ येत महाविकास आघाडी सरकार राज्यात स्थापन केले आहे. या महाविकास आघाडीने कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक एकत्र लढणार असल्याचे जाहिर केले आहे. तशी घोषणा राष्ट्रवादीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांनी केली. शिंदे म्हणाले की, भाजप आणि मनसेला शह देण्यासाठी आम्ही चांगली तयारी करू असे म्हणाले आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक आहेत. 
पक्षाला तारण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांना जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपविली आहे. आज जगन्नाथ शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्या घरी मोठ्या संख्येने जमा झाले होते.
यावेळी शिंदे म्हणाले, कल्याण डोंबिवली महापालिका पुर्वी पक्षाची बांधणी करायची आहे. 

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत रखडलेल्या विकासकामांना चालना देण्याचा माझा पहिल प्रधान्य असेल असे, शिंदे यांनी स्पष्ट सांगितले आहे. यामध्ये स्वच्छता, रस्ते, पाणी आरोग्य या महत्वाच्या बाबींवर मी जास्त लक्ष देणार आहे, असे शिंदे यांनी सांगितले आहे.

राज्यात शिवसेना, काँग्रेस आाणि राष्टवरादीचे राज्यात महाआघाडीचे सरकार आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडी एकञ लढवणार आहे. त्यात राष्ट्रवादीचे 14 नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. 

सगळ्यांना समान न्याय देताना पुन्हा एकदा महापौर आघाडीचा कसा येईल याकडे माझे लक्ष आहे, असे शिंदे म्हणाले.

Post a comment

0 Comments