उमरी ग्रामीण रुग्णालयाची अवकळा सर्वच मशनरी बंद अवस्थेत, तर इमारतींची दैनिआवस्था अनेक सुविधा पासुन हा दवाखाना वंचित.

उमरी ग्रामीण रुग्णालयाची अवकळा सर्वच मशनरी बंद अवस्थेत, तर इमारतींची दैनिआवस्था अनेक  सुविधा पासुन हा दवाखाना वंचित.
 

नांदेड (उमरी), दि.२२ रविवार : उमरी ग्रामीण  रुग्णालय हे गेल्या चाळीस वर्षापासुन  निष्कृर्ष्ठ  इमारती मध्ये  चालु असुन सदर

 इमारत ही फार जुन्नी झाली आहे. या जुन्या   इमारतींची  मोठी अवकाळ  आली असुन दरवर्षी  याच इमारतीला पावसाळ्यात डागडुगी करुन  नुसते बिले उचलुन घेण्याचा सपाटा आहे. त्यामूळे आरोग्य शासनाचा येणारा  निधीची विलेवाट लावले गेले.

 ग्रामीण रुग्णालयाला अध्याप वैद्यकिय अधिक्षक नसल्याने  या रुग्णालयाचा कारभार प्रभारी वैद्यकिय अधिक्षक डाॅ शंकर चव्हाण यांच्या कडे देण्यात आले. कोरोना कोरोना काळात  कोवीड च्या नावाखाली आलेला निधी  व  उमरी शहरातील अनेक दानशुर व्यक्तीने लाखो रुपये दिले होते.त्याही पैशावर डला मारण्यात आले. यामध्ये  या ग्रामीण रुग्णालयात ओषधी साहित्य न आणता येथील  त्यामधून कागदोपत्री बिले लाऊन आलेला निधी उचलुन घेऊन सर्व डाॅक्टरासह काही रुग्ण कल्याण  समितीच्या सदस्यासह वाटुन घेतले असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात  जनतेतून पुढे येत आहे.  


तालुक्यातील  एक लाख लोकसंख्येच्या सेवेसाठी हे  एकमेव उमरी ग्रामीण  रुग्णालय आहे.या ठिकाणी दररोज मोठया प्रमाणात रुग्णालय रुग्ण येतात.परंतु याठिकाणी कुठलीच सुविधा उपलब्ध नसल्याने येणा-या ग्रामीण भागातील रुग्णाची कुचंबणा होत आहे. इमारतींच  दैनिआवस्था तसे झाल्याने हे दवाखाना  छोटे पडत असुन या रुग्णालयात डिलेव्हारी रुम आहे मात्र ती  गळके आसल्याने ती नेहमी बंद असते. तर एक्सरे असुनही ती मशीन  बंद अवस्थेत  आहे.इसीजी मशीज बंद आहे.

या ग्रामीण रुग्णालयात ग्रामीण भागातुन महिला जास्त रुग्ण म्हणून येतात. त्यामुळे याठिकी स्ञीरोगतज्ञ वैद्यकिय अधिकारी  नसल्याने महिला ची वाताहत होते.तसे काही जागरुक महिलांनी थेट मुख्यमंत्री व आरोग्य मंञी  यांनाही निवेदन पाठवले आहे. 

  प्रसूती  स्ञीरोगतज्ञ डाॅक्टर महिला नसल्याने ग्रामीण भागातील महिला ह्या   इतर खाजगी रुग्णालयात सिजर प्रसुती साठी जावे लागत असल्याने  नातेवाईकांना मोठी किंमत मोजावी लागत आहे.  

परवाच उमरी शहरात चार ते पाच दिवसा च्या खाली खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर आले  होते तेव्हा 

रुग्णांना सुविधा व स्ञीरोगतज्ञ वैद्यकिय अधिकारी   उपलब्ध करून देण्याची  मागणी   महिला मौच्याच्या तालुकाध्यक्ष प्रणिता जोशी,भाजपाच्या जिल्हा सचीव प्रेमलताताई अग्रवाल यांच्या इतर महिलानी निवेदन दिले यावेळी  माजी आमदार बापुसाहेब देशमुख गोरठेकर हेही उपस्थितीत होते. तसेही तालुका वासियातुन होत आहे.

     तत्कालीन आमदार बापुसाहेब देशमुख गोरठेकर हे भागाचे आमदार असताना उमरी ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय करण्यासाठी पराकाष्ठा केली होती.नंतर गोरठेकराची आमदारकी गेल्याने तसाच प्रश्न रेंगाळला आहे. येथील वैद्यकिय अधिक्षक हे प्रभारी आधिक्षक असल्याने आठवड्यातून फक्त दोन दिवसच या ग्रामीण रुग्णालयात  वैद्यकिय सेवा देतात नंतर ते खाजगी रुग्णालयात सेवा देतात. त्यामुळे पुर्ण वेळ वैद्यकिय अधिक्षक मिळुन देण्यात यावे अशीही मागणी खासदाराकडे करण्यात आले आहे. 

           उमरी शहराला लागुन ६८ गावे आहेत. ग्रामीण भागातून मोठया प्रमाणात गोरगरीब महिला उपचारासाठी येतात.येथे एक्सरेमशीन, ईसीजी मशीन, अन्य मशनरी बंद आहेत.येथे महिलाच्या प्रसुती होत नाही. ऑपरेशन थेटर बंद आहे.दवाखाना मोडकळीस आला.येथे महिला स्ञीरोगतज्ञ डाॅक्टर नाहीत. त्यामुळे महिला ची मोठी कुचंबणा होते.अनेक सुविधा पासुन वंचित हे ग्रामीण रुग्णालय  आहे.तरी सर्वसोईयुक्त ग्रामीण रुग्णालय करुन देण्यात यावे.व स्ञीरोगतज्ञ डाॅक्टर महिला देण्यात यावे. 

         

         

Post a comment

0 Comments