खावटी योजनेची वस्तू खरेदी तात्काळ थांबवा, विवेक पंडित यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

उसगाव : खावटी योजनेच्या माध्यमातून होणारी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी तात्काळ थांबवावी अशी मागणी राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) तथा, श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी केली आहे. यासंदर्भात पंडित यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही लिहले आहे. यात वस्तू खरेदीची निविदा प्रक्रिया आणि खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होण्याची शक्यता आहे, असं झाल्यास सरकारचा मूळ हेतू साध्य होणार नाही असं विवेक पंडित यांनी पत्रात लिहलं आहेे.

Post a comment

0 Comments