महापौरांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अध्यक्षांना पत्र

नाशिक : नाशिक स्मार्ट सिटी प्रकल्प सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांच्या मनमानी कारभाराविरोधात आता पालिकेच्या महापौरांनीच दंड थोपटले आहे. थविल यांच्या बदलीसाठी महापौरांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अध्यक्षांना पत्र लिहित या अधिकाऱ्याला कार्यमुक्त करण्याची मागणी केली आहे.

केंद्रात, राज्यात आणि पालिकेत भाजपचं सरकार असताना अनेक लोकप्रतिनिधींचा विरोध डावलून नाशिक शहरात स्मार्ट सिटी प्रकल्प राबविण्याचा निर्णय भाजपने घेतला. मात्र भाजपाचा हाच निर्णय त्यांच्या अंगलट आला आहे. सुरुवातीपासून वादात राहिलेल्या नाशिक स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांच्या मनमानी कारभारामुळे सत्ताधारी भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे.मात्र महापौरांनी ही कोंडी फोडत या प्रकल्पाचे अध्यक्ष सिताराम कुंटे यांच्याकडे थविल यांच्या मनमानी कारभाराची तक्रार केली. ठेकेदारांना परस्पर मुदत वाढ देणे, सदस्यांना विश्वासात न घेता सुरु असलेले कामकाज अशा सर्वच तक्रारीचा पाढा महापौर सतीश कुलकर्णी यांनी वाचला. तसेच थविल यांना कार्यमुक्त करण्याची मागणीही त्यांनी केली.

Post a comment

0 Comments