पालिका आयुक्तांच्या बंगल्याला लागली आग

नवी मुंबई: नवी मुंबई  महानगरपालिका आयुक्त निवासस्थानी आग लागली आहे. नेरूळ अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहचले आहे. अग्निशमन दलाच्या पथकाचे आग विझवण्याचे शर्थीचे काम सुरू आहे. मात्र, आयुक्त निवासातून धुराचे लोट मोठ्या प्रमाणावर येत असल्याने बंगल्याबाहेर बघ्यांची गर्दी झालेली आहे. नेरुळ रेल्वे स्थानकासमोर हे आयुक्त निवास आहे. 
१९९८ मध्ये पालिकेने नेरुळ सेक्टर १५ मध्ये एक विस्तीर्ण असा भूखंड सिडकोकडून विकत घेतला. त्यावर श्रीमंत नवी मुंबई पालिकेला शोभेल असा अलिशान बंगला बांधला आहे. चार बेडरूम, दोन हॉल, तीन बैठक रूम आयुक्त बंगल्यात आहेत. एक आठवड्यापूर्वी बंगल्याची रंगरंगोटी करण्यात आली होती.

Post a comment

0 Comments