एका झटक्यात Reliance ला ६८०९३ कोटींचे नुकसान

मुंबई:- देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) च्या शेअर्समध्ये सोमवारी मोठी घसरण झाली. तब्बल ६ टक्क्यांनी शेअर पडले. सप्टेंबर तिमाहीत नफा घटल्याने शेअरवर त्याचा परिणाम जाणवला. शुक्रवारी उशिरा कंपनीने तिमाहीचे आकडे स्टॉक एक्स्चेंजला दिले होते. यामुळे सोमवारी बाजार उघडताच रिलायन्सचे शेअर धडाधड कोसळायला सुरुवात झाली. 
बीएसईवर कंपनीचा शेअर  ५.५४ टक्क्यांनी घटून १९०४.५० रुपयांवर आला होता. तर एनएसईवरदेखील ५.५७ टक्के शेअर पडून १९४०.०५ वर आला होता. या पडझडीमुळे कंपनीटे बाजारमुल्य एका झटक्यात ६८९३.५२ कोटींनी कमी झाले. ते सध्या १३२१,३०२.१५ कोटी रुपये झाले आहे. सप्टेंबर तिमाहीत कंपनीच्या नफ्यात १५ टक्क्यांची घट नोंदविली गेली. 
देशातील सर्वाधिक बाजारमुल्य असेलेली कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने दुसऱ्या तिमाहीतील निकाल घोषित केले आहेत. कंपनीला सप्टेंबरच्या तिमाहीमध्ये एकूण ९५७६ कोटींचा फायदा झाला आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत हा फायदा १५ टक्क्यांनी तुटला आहे. गेल्या वर्षी दुसऱ्या तिमाहीत ११२२६ कोटींचा फायदा झाला होता. महत्वाचे म्हणजे कोरोना काळात रिलायन्सला परदेशातून करोडो रुपयांची गुंतवणूक मिळाली आहे. 
देशभरात कोरोना संकटामुळे लॉकडाऊन असूनही कंपनीला जूनच्या तिमाहीत ८३८० कोटींचा नफा झाला होता. वार्षिक आकडेवारीनुसार कंपनीला शुद्ध नफ्यामध्ये १५ टक्क्यांची घट सहन करावी लागली आहे. कंपनीचे उत्पन्ना २०२० च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये घटून १.२ लाख कोटी रुपये झाले. जे वर्षभरापूर्वी २०१९- २० मध्ये याच तिमाहीत १.५६ कोटी एवढे होते. 
गेल्या चार वर्षांत देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी बनलेल्या रिलायन्स जिओचा शुद्ध नफा या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत तिपटीने वाढला आहे. जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीला लाभ २८४४ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीत कंपनीला ९९० कोटी रुपयांचा लाभ झाला होता. तिमाहीच्या आधारे ही वाढ १२.८५ टक्के एवढी आहे. जूनच्या तिमाहीमध्ये कंपनीला २५२० कोटींचा निव्वळ नफा झाला होता. 

Post a comment

0 Comments