धक्कादायक!!!!! सुशिक्षित मुलांनी तब्बल 10 वर्षांपासून केलं स्वत:लाच खोलीत बंद.राजकोट, दि.२९ डिसेंबर : गुजरात राज्यातील राजकोटमध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. राजकोटमध्ये तीन भावा-बहिणींनी स्वत:ला जवळपास 10 वर्षांपर्यंत एका बंद खोलीमध्ये कैद केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका एनजीओने त्या तिघांना वडिलांच्या मदतीने वाचवलं आहे. या तिघांचेही वय 30 ते 42 वर्षांच्या दरम्यान आहे.
'साथी सेवा ग्रुप' नावाच्या बेघरांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या एनजीओचे अधिकारी जालपा पटेला यांनी याबाबतची हकिकत सांगतिलं आहे. त्यांनी सांगितलं की, जेंव्हा रविवारी संध्याकाळी त्यांच्या संघटनेच्या सदस्यांनी खोलीचा दरवाजा तोडला तेंव्हा त्यांना खोलीत जराही प्रकाश आढळला नाही. खोलीतून शिळ्या अन्नाचा तसेच मानवी विष्ठेचा वास येत होता. तसेच खोलीत चारी बाजूला वर्तमान पत्र पसरले होते. पटेल यांनी म्हटलं की, अमरीश आणि भावेश तसेच त्यांची बहिण मेघना यांनी जवळपास 10 वर्षांपूर्वी स्वत:ला खोलीमध्ये बंद करुन घेतलं होतं. त्यांच्या वडिलांनीच ही माहिती दिली. त्यांनी म्हटलं की तिघांचीही स्थिती खूपच खराब तसेच अस्ताव्यस्त होती. त्यांचे केस तसेच दाढी एखाद्या भिखाऱ्यासारखे वाढले होते. ते इतके कमकुवत झाले होते की उभे देखील राहू शकत नव्हते. 
पटेल यांच्या सांगण्यानुसार, त्या तिघांच्या वडिलांनी सांगितलं की जवळपास 10 वर्षांपूर्वी आईचं निधन झाल्यानंतर ते याप्रकारच्या स्थितीत राहू लागले. त्यांनी म्हटलं की त्यांची मानसिक स्थिती तीच आहे, जे त्यांचे वडिल सांगत आहेत. तसेच त्या तिघांना उपचारांची तात्काळ आवश्यकता आहे. एनजीओच्या सदस्यांनी त्या तिघांना बाहेर काढलं. त्यांची योग्यरित्या साफसफाई केली. त्यांचे केस कापले तसेच त्यांची दाढी केली. पटेल यांनी सांगितलं की एनजीओने त्या तिघांना अशा ठिकाणी पाठवायचे नियोजन केलं आहे जिथे त्यांना योग्य जेवण आणि उपचार मिळू शकेल. 
या तिघांचे वडिल सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी आहेत. त्यांनी सांगितलं की त्यांची मुले सुशिक्षित आहेत. वडिलांनी सांगितलं की, माझा मोठा मुलगा 42 वर्षांचा आहे. त्याच्याजवळ बीए, एलएलबी ची डिग्री असून तो वकिली करायचा. माझी छोटी मुलगी मेघान 39 वर्षांची असून तिने यांनी मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. माझा सर्वात लहान मुलगा अर्थशास्त्रात पदवीधर झाला असून तो एक चांगला क्रिकेटपटू होता. त्यांनी म्हटलं की, त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्यामुळे माझ्या मुलांना जबर मानसिक धक्का बसला. त्यानंतर त्यांनी स्वत:ला एका खोलीत बंद करवून घेतलं. त्यांनी म्हटलं की, ते रोज खोलीच्या बाहेर जेवण ठेवायचे.  वडिलांचं म्हणणं आहे की, काही नातेवाईकांनी त्यांच्यावर काळा जादूटोणा केला आहे. या प्रकरणाबाबत अद्याप कोणतीही तक्रार पोलिसांकडे दाखल करण्यात आलेली नाहीये.  

Post a comment

0 Comments